तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील मंगरुळ येथे मक्ररसंक्रात निमित्ताने घेण्यात आलेल्या हळदी-कुंकु कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला  या कार्यक्रमाचा आरंभ  जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते हळदी-कुंकु लावुन तीळगुळ व वाण देवुन करण्यात आला.

या वेळी समारोप करताना जि.प.उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, मंगरुळ गावात विविध विकास कामे करण्यासाठी   जिल्हा परीषद सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही देवुन ग्रामदेवत कंचेश्वर तसेच खंडोबा मंदीर येथे सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी लवकरच देण्यात येईल व मुस्लीम स्मशानाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील,असे आश्वासन दिले.

  हळदी-कुंकु कार्यक्रमात ग्रामीण भागातील महिलांनी आत्मनिर्भार बनण्यासाठी काय करावे व महिलांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  माजी पं.स उपसभापती तथा विद्यमान पं.स सदस्य चित्तरंजन अण्णा सरडे यांनी परिश्रम घेतले.या हळदी-कुंकु कार्यक्रमास पंचक्रोषीतील सर्वजाती धर्माच्या महिला उपस्थितीत होत्या.


 
Top