तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूर येथील युवा क्रिकेटपटू हर्षवर्धन  हंगरगेकर याने विश्वचषक मध्ये आपल्या कामगीराचा जोरावर  ठसा उमटवल्या  आता आयपीएल मध्ये आपल्या अष्टपैलु खेळाची कसब दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे.

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथील युवा खेळाडू हर्षवर्धन हंगरगेकर यांनी  १९  वर्ष वयोगटातील विश्वचषक जिंकुन देवुन  क्रिकेट जगतात  आपले लक्ष  वेधुन घेतले होते. युवा अष्टपैलु क्रिकेटपटू हर्षवर्धन हंगरगेकरला   अखेर  मुंबई इंडियन्सवर मात करुन धोनीचा  चेन्नई सुपर किंग्जमध्ये  सुमारे दीड कोटीची बोली लावुन आपल्या संघात घेतले.

क्रिकेटपटू हर्षवर्धन  हंगरगेकर हा वेगवान गोलंदाज आणि आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. त्याने १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये अनेक सामन्यात स्लॉग ओव्हरमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली होती. याचबरोबर तो वेगवान गोलंदाजी  करतो.  तो  भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे.    महेंद्रसिंग  धोनीसारखा मार्गदर्शनाखाली त्यास खेळण्यास मिळणार असल्याने  या अनुभवाचा जोरावर तो लवकरच भारतीय संघात प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

भारताने  जिंकलेल्या युवा विश्वचषक संघात  हर्षवर्धन चा सिंहाचा वाटा होता. कठीण प्रसंगी राज्यवर्धनने संघाला सारवल्याचेही पाहायला मिळाले. त्याचबरोबर या संपूर्ण विश्वचषकात तो लक्षवेधी ठरला होता. भारतीय संघाला ब-याचदा त्याने चांगली सुरुवात करून दिली होती. आपल्या वेगवान गोलंदाजीने राज्यवर्धनने या विश्वचषकता आपली छाप पाडली होती. त्याचबरोबर संघाला जेव्हा गरज होती तेव्हाही त्याने विकेट्स मिळवून देण्याचे काम केले होते. राज्यवर्धन हा मूळचा तुळजापूरचा असून तो १९ वर्षांचा आहे. त्यामुळे एवढ्या कमी वयात त्याला धोनीसारख्या परीसस्पर्श असलेल्या खेळाडूच्या सानिध्यामध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता राज्यवर्धनला यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळते का आणि तो या संधीचे सोने करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 
Top