उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 हजरत ख्वाॅजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा ७१७  वा उरुस चालु आहे,सर्व जाती धर्मातील  लोक हजरत ख्वाॅजा शमशोद्दीन गाजी रहे यांना अभिवादन करण्यासाठी येतात,दोन वर्ष कोरोना जैविक विषाणु महासंकट असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करुन केवळ धार्मिक विधीने उरूस साजरा करण्यात आला.

कोरोना जैविक विषाणु महासंकटामुळे शासनाने लावलेल्या कोरोना नियमांचे पालन करुन उरूस साजरा होत आहे, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सहारा चालक मोटार वाहन संघटनेने इतर खर्च न करता दर्ग्यात येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केली व गेल्या सोळा वर्षांपासून करित असलेले अन्नदान त्यांनी निरंतर चालू ठेवले.अन्नदान करण्यापुर्वी धार्मिक विधी मौलाना यांनी केले.यात प्रामुख्याने सह्याद्री फाॅऊण्डेशन संस्थापक अध्यक्ष डॉ.दिग्गज दापके, नगरसेवक नादेरुल्ला हुसेनी, नगरसेवक बाबा मुजावर, अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष तथा मिशन वात्सल्य समन्वयक समिती सदस्य फेरोज पल्ला, सामाजिक कार्यकर्ते तथा मिशन वात्सल्य समन्वयक समिती सदस्य गणेश रानबा वाघमारे,सहारा मोटार मालक वाहन संघटनेचे अध्यक्ष युसूफ शेख,उर्स कमेटीचे अध्यक्ष इरशाद शेख,मुन्तझर सय्यद,गुन्नु काझी,तनवीर मोमीन,शाहेद शेख,इस्माइल सय्यद,उमर शेख इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top