उस्मानाबाद/ प्रतिनिधी- 

राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार हे उद्या, दि.24 फेब्रुवारी 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सकाळी 9.20 वा. पुणे येथील आर्की हेलीपॅड येथून हेलीकॉप्टरने उस्मानाबाद (तुळजापूर) कडे प्रयाण. सकाळी 10.55 वा. तुळजापूर हेलीपॅड येथे आगमन आणि शासकीय वाहनाने विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि राखीव. सकाळी 11.15 वा. तुळजापूर देवस्थान येथे आगमन आणि आई भवानीमाता दर्शन व अभिषेक. दुपारी 1.00 वा. तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 1.15 वा. तुळजापूर हेलीपॅड येथून बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईकडे प्रयाण.

 
Top