उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद शहरासह जिल्हयात शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबीर, मोटारसायकल रैली यासह अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. मागील दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शिवजयंती नाममात्र साजरी करण्यात आली होती. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने उस्मानाबाद शहरासह जिल्हयात अभूतपुर्व उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. 

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने उस्मानाबाद शहरात शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ पुतळयास आमदार राणाजगजितसिंह पाटील व त्यांच्यापत्नी जि.प.च्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या शुभहस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी धर्मवीर कदम, चंद्रकांत बागल, डॉ.भारत माने, प्रकाश जगताप समितीचे अध्यक्ष राम मुंडे, पत्रकार राजाभाऊ वैद्य,माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, नाना निंबाळकर,  अाभिलाष लोमटे, माजी नगराध्यक्ष विश्वास शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी, उपविभागीय अधिकारी खरमाटे, मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे, तहसीलदार गणेश माळी आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर मल्लखांब प्रत्यक्षीक दाखिवण्यात आले. शहरातून दुपारी युवकांनी भगवा ध्वज लावून भव्य मोटारसायकल रैली काढली. 

 
Top