उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 गेल्या अनेक वर्षांपासून अंजिठा नगर येथील रस्ते नाल्यांची दुरावस्था झाली होती, नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 14 मधील अनेक विकास कामे पूर्ण होत गेली,दोन वर्ष कोरोना जैविक विषाणु महासंकटात काही प्रमाणात कामे करता आली नाहीत तरिही त्यांनी शक्य ती कामे केली आहेत.

आज रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंजिठा नगर येथील रस्ता व नालीचे कामाचा शुभारंभ  जनता बॅंकेचे संचालक आशिष मोदाणी, वंचित आघाडी चे मा.जिल्हा उपाध्यक्ष विकास बनसोडे, बहुजन समाज पार्टीचे संजय वाघमारे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांच्या शुभहस्ते नारळ फोडुन करण्यात आला.

या्वेळी मा.नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे, शहर सरचिटणीस संजय गजधने, सामाजिक कार्यकर्ते अंगुल बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे, माजी नगरसेवक अशोक बनसोडे, प्रशांत बनसोडे, सुनिल कांबळे, श्रीकांत चिलवंत,भैय्या नागटिळे, करण वाघमारे, राहुल बनसोडे, रमेश गंगावणे, प्रविण सर बनसोडे, रणजित कांबळे,सुकाळे साहेब, कांबळे साहेब(इन्शुरन्स)आँफिस, रोहित बनसोडे, नंदु हावळे व अजिंठा नगर येथील नागरिक उपस्थित होते.

 
Top