उमरगा/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील कदेर येथील 15 तारखेला होणारा नियोजित बालविवाह रोखून जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीने आणि प्रशासनाने मोठं यश मिळवलं आहे तर धाडसी “रेश्मा” च्या आर्थिक बिकट परिस्थिती पाहता तिच्या पदवीपर्यंत शिक्षणासाठी जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी सुनील अंकुश यांनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले यावर रेश्मा ला मोठा शैक्षणिक आधार भेटला असून तिच्या आई वडिलांत आपल्या मुलीबद्दल आदर निर्माण झाला.

 दरम्यान उमरगा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला बालकल्याण विभागाच्या समुपदेशक राऊ भोसले यांना कदेर गावातून रेश्मा ने फोन करून आपल्या आई वडिलांनी एका छोट्या कार्यक्रमात लग्न लावून देणार असल्याबाबत माहिती दिली.राऊ भोसले यांनी लागलीच जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना कळविले त्यावर सचिन बिद्री यांनी लागलीच आलेल्या नंबर वर फोन करून अधिक माहिती घेतली,तोपर्यंत “तू फोन करून का सांगितले” म्हणून रेश्मा च्या वडिलांनी रेश्मा ला मारहाण केल्याबाबत रेश्मा ने सचिन बिद्री यांना सांगितले यावर श्री बिद्री यांनी रेश्मा च्या धाडसी निर्णय बाबत कौतुक करीत तिला आधार दिला व प्रेरित केले तर वडिलांची कानउघडणी करीत मुलीच्या शिक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत समुपदेशन केले आणि संबंधित प्रकार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, महिला बालकल्याण अधिकारी सुनील अंकुश, तहसीलदार राहुल पाटील व प्रभारी पो नी कवडे यांना सांगितले.

        उद्याच्या तारखेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी दिवेगावकर आणि उमरगा तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी सात वाजता ‘पथक’ कदेर गाव गाठले.काही क्षणातच सरपंच सतीश जाधव, उपसरपंच राणी राठोड, ग्रामसेवक व्ही बी राजपूत,बिट अंमलदार एन बी वाघमारे,मंडळ अधिकारी जेवळीकर,तलाठी एम एम अंबर, पोलीस पाटील सुनील पाटील आदी ग्रामपंचायत गाठले,यावेळी बालविवाह बाबत जनजागृतीस सुरुवात झाली,ग्रा.पं. सदस्य मीनाक्षी जाधव, इंद्रजित जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या जनजागृती कार्यक्रमात सहभागी झाले.  

 
Top