उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सर्वात मोठी असलेल्या सारोळा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्रीकृष्ण उर्फ भाऊसाहेब मारूती रणदिवे तर व्हाईस चेअरमनपदी महावीर देवगिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संचालक मंडळासह आता चेअरमन व व्हाईस चेअरमनची निवडही बिनविरोध झाल्याने सारोळा गावाने नवा पॅटर्न निर्माण केला आहे. निवडीनंतर नूतन पदाधिकारी व संचालकांचा जंगी सत्कार करण्यात आला.

सारोळा येथील विकासे सोसायटीची आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे. त्यातच सोसायटीच्या १३ संचालक पदासाठी निवडणूक कार्यक्रम झाला होता. मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास घाडगे-पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. त्यानंतर सर्व १३ संचालकांची निवड बिनविरोध झाली होती. तर शुक्रवारी (दि.१८) चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. सोसायटी कार्यालयात सकाळी ११ वाजता सहाय्यक निबंधक श्री. सावतर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी चेअरमनसाठी श्रीकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब रणदिवे तर व्हाईस चेअरमन पदासाठी महावीर देवगिरे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी बी. एच. सावतर यांनी चेअरमनपदी रणदिवे तर व्हाईस चेअरमनपदी देवगिरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीची घोषणा होताच नूतन पदाधिकाऱ्यांसह संचालकांचा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच प्रशांत रणदिवे, रमेश रणदिवे, ॲड. श्यामसुंदर सारोळकर, निवृत्ती कुदळे, नूतन संचालक अमर बाकले, गौतम रणदिवे, अरूण मसे, दैवशाला बाकले, कुंदा मंडोळे, भाऊसाहेब चव्हाण, जोतिराम रणदिवे, अनंतराव कठारे, बिरू आगाशे, अनिल चंदणे, वैभव पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुजित बाकले, नितीन पाटील, विनोद बाकले, सुधाकर देवगिरे, बलराज रणदिवे, खंडू शिंदे, बबलू रणदिवे, शिवाजी पडवळ, बालाजी देवगिरे, सत्यवान काकडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक अधिकारी बी. एच. सावतर यांना सचिव गुलाब सुर्यवंशी व लिपिक धनंजय साठे यांनी सहकार्य केले. 

 
Top