उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कर्नाटकात युनिफॉर्म सक्तीला समर्थन करत हिजाबविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्यामुळे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा यांची हिजाब समर्थकांनी हत्या केली. याचा निषेध व आरोपींना फासावर द्यावे, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 

निवेदनात म्हटले आहे की, पाॅपुलर फ्रंट आॅफ इंडिया, कॅम्पस फ्रंट व सोशल डेमाॅक्रॅटिक पार्टीची पाळेमुळे महाराष्ट्रात खोलवर रुजली आहेत. या संघटनांवर बंदी घालावी. निवेदन देताना बजरंग दल जिल्हा संयोजक अॅड. विक्रम साळुंके, विंहिंप जिल्हामंत्री श्रीकृष्ण धर्माधिकारी, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चवरे, बाबुराव महाराज पुजारी, समरसता जिल्हाप्रमुख परमेश्वर शिंदे, अॅड. प्रमोद झांबरे, डॉ. अजित नायगावकर, अमोल सूर्यवंशी, हभप महादेव महाराज साळुंके, डॉ. विष्णु मुंडे, सुदर्शन साखरे महाराज, अभाविपचे निखिल शेंडगे, तेजसिंह कोळगे, बजरंग दल प्रखंड संयोजक अमरसिंह कोळगे, गणेश माळी उपस्थित होते.कार्यकत्याच्या हत्येच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या वतीने निवेदन देण्यात आले.


 
Top