उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अंडरवर्ल्डशी संबंध, मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात ईडीने अटक करूनही मंत्रिपदाचा राजीनामा न देणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांना पाठीशी घालणाऱ्या महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

भाजपने आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली   जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. याप्रसंगी नितीन काळे यांनी बोलताना सांगितले की, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने १९९३ बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लाँड्रिंगशी प्रकरणी अटक केली. कोर्टाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी दिली. अनिल देशमुखांचा राजीनामा ताबडतोब घेणारे शरद पवार, नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता तत्काळ त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी आगामी काळात आंदोलने तीव्र करणार.

यावेळी भाजपचे दत्ताभाऊ कुलकर्णी, ॲड. मिलिंद पाटील, ॲड. खंडेराव चौरे, ॲड. अनिल काळे, ॲड. सतीश दंडनाइक, ॲड. नितीन भोसले, राजसिंहा राजेनिंबाळकर, रामदास कोळगे, विजय शिंगाडे, प्रवीण सिरसाठे, इंद्रजीत देवकाते, पांडुरंग लाटे, गुलचंद व्यवहारे, विनायक कुलकर्णी, राहुल काकडे, दाजीप्पा पवार, बालाजी कोरे, ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, शेषराव उंबरे, प्रेम पवार, वैभव हांचाटे, विनोद निंबाळकर, अमोलराजे निंबाळकर, राहुल शिंदे, आनंद भालेराव, संदीप इंगळे, मेसा जानराव, गणेश मोरे, नरेंद्र वाघमारे, गिरीश पानसरे, अजय यादव, पंकज जाधव, सुनील पांगुडवले, सागर दंडणाईक, विशाल चव्हाण, प्रसाद मुंडे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top