उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व पिटु भैय्या गंगणे यांच्या वाढदिवसा निमीत्त आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन सोमवार दि.२८ फेब्रुवारी २०२२ रोजी, शुक्रवार पेठ भोसले गल्ली, तुळजापुर येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात तुळजापुर व परिसरातील सर्व वयोगटातील ३६५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन विनोद (पिटु भैय्या) गंगणे व राजा मामा भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे सुभाष भोसले, संजय भोसले, माऊली भासले, मोहन दादा भोसले, बाबा भोसले, रविदादा भोसले, भिमा जवंजाळ, नारायण पतंगे, प्रतीक भोसले, राम भासले, अनिकेत भोसले, कुणाल जाधव, विकी भोसले, उदय भोसले, अभिजित भोसले, कालीदास भोसले, तुषार भोसले, विराज भोसले, रितेश भोसले, समस्त भोसले गल्ली परिवार उपस्थीत होत.

यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. दिपक बाराते, डॉ.परवीन सय्यद, डॉ.अपुर्व दुबे, डॉ.सोहम रुपारेल, डॉ.रोहीत दामोदर, डॉ.शाहन शेख, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना  शिंदे ईत्यादींनी परीश्रम घेतले.


 
Top