उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील त्रिमूर्ती स्पोर्ट बॅडमिंटन ॲकॅडमी च्यावतीने २६आणि२७ फेब्रुवारीला उस्मानाबादेत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आल्या. १३ वर्षाखालील गटामध्ये राम शितोळे, अवधूत कुंभार,१७ वर्षाखालील गटातून पलक कोठारी,पायल ढवळे,१९ वर्षीय गटातून अनिकेत इंगोले,प्रशांत कोतकर   पुरुष दुहेरी खुल्या गटामधून प्रथम सुशील पाळणे आणि आयचीत द्वितीय रितेश ठोंगे, पियुष पाटील यांनी यश मिळवले. 

   अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले - डबे, बॅडमिंटन संघटनेचे सचिव श्रीकांत साखरे नायब तहसीलदार केरूलकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विनायक वांजरे,सुशील पाळणे,प्रतीक पाटील, दिग्विजय वेदालंकार,अमोल गायकवाड,रितेश ठोंगे,अथर्व देशपांडे यांनी परिश्रम घेतले.   यावेळी व्यासपिठावर प्रशांत पाटील ,अग्निवेश शिंदे,चेतन वाठवडे उपस्थित होते


 
Top