उस्मानाबाद / प्रतिनिधी-

एमआयएम पार्टीचे खा. असदोद्दीन ओविसी यांच्यावर झालेल्या जिवघेणी हल्लाचा उस्मानाबाद Aएमआयएम पार्टीच्या वतीने निषेध नोंदवून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 खा.असोदोद्दीन ओविसी यांच्यावर छिजारसी टोल गेटवर काही समाजकंठक लोकांनी त्यांच्यावर जिवघेणी हल्ला केला. परंतु सुदैवाने ते त्यांच्यातुन वाचले व त्यांच्या वाहनावर चार राऊंड फायर झाले व ते त्यांचा जिव घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही दिल्ली येथे त्यांच्या राहत्या घरावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच ओवीसी यांना झेडप्लस सुरक्षा गृहमंत्रालयाकडून त्वरीत देण्यात यावी. हल्यामागील दोषींना त्वरीत अटक करुन कठोर शासन करण्यात यावे. यावेळी एमआयएमचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मुस्तफाखान, शहराध्यक्ष अजहर मुक्तार सय्यद, माजी शहराध्यक्ष मोसिन शेख, युवा शहर उपाध्यक्ष शहानवाज पटेल, शहर उपाध्यक्ष अजर निचलकार, वाजिद तांबोळी, माजी जिल्हा उपाध्यक्ष युवक जफर शेख, सद्दाम मुजावर, मुकेश शिंदे आदी उपस्थित होते.

 
Top