उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा पोलिस दलातील चालक पोलिस शिपाई-२०१९ परीक्षेचा निकाल शुक्रवारी लागला. त्यानुसार तात्पुरती निवड यादीही जाहिर करण्यात आली. यावर कुणाला आक्षेप असल्यास संबंधितांनी लेखी आक्षेप नोंदवण्याची सूचना पोलिस प्रशासनाने केली.

तात्पुरती निवड यादी उस्मानाबाद पोलिस दलाच्या https:/osmanabadpolice.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिध्द केली. ही निवड यादी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. “मी वाहन चालक पोलिस शिपाई- २०१९ या परीक्षेकरीता महाराष्ट्र पोलिस दलाच्या एका पेक्षा अधिक घटकांत अर्ज भरलेला नाही. फक्त उस्मानाबाद पोलिस घटकात अर्ज भरलेला आहे.” अशा स्वरूपाचे बंधपत्र भरुन देण्यासाठी यादीतील उमेदवारांनी आठ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी दहा वाजता पोलिस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद येथे हजर रहावे. तसेच तात्पुरत्या निवड यादी बाबत उमेदवारास आक्षेप असल्यास त्यांनी लेखी आक्षेप सात फेब्रुवारीपर्यंत पोलिस अधीक्षक कार्यालयास कळवावे. अंतीम निवड यादी त्यानंतर प्रसिध्द केली जाणार आहे. असे आवाहन पोलिस अधीक्षक नीवा जैन यांनी उमेदवारांस केले आहे.

 

 
Top