उस्मानाबाद / प्रतिनिधी-

युक्रेन-रशिया यांच्या युध्दाच्या पार्श्वभुमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये मेडिकल कॉलेजचे शिक्षण घेत असून उस्मानाबाद मतदार संघातील आत्तापर्यंत एकुण चार विद्यार्थ्यांची माहिती मिळाली असून त्यांना मायदेशी सुखरुप परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कळविले आहे.

 मागील काही दिवसापासून युक्रेन-रशिया यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊन दोन्ही देशांमधील सबंध विकोपास गेल्याने रशियाचे राष्ट्रपती व्लादीमिर पूतीन यांनी युध्दाचा पर्याय घेणार असल्याचे जाहीर करुन मागील काही दिवसापूर्वी युक्रेनवर सैनिकी हल्ला करुन युक्रेनमधील अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ले केले आहेत.

 या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले असल्याने त्यांना सुखरुप मायदेशी परत आणणेकरीता खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी विदेश मंत्रालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती विदेश मंत्रालयाच्या सिच्युवेशन रुमला दिली आहे. विदेश मंत्रालयाच्या सिच्युवेशन रुमकडून सर्व विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी परत आणण्यास होकार मिळाला असून लवकरच त्यांच्याशी संपर्क साधला जाणार आहे असे कळविण्यात आले.

खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी युक्रेनमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधत त्यांना धीर दिला आहे. तसेच आणखीन काही विद्यार्थी असल्याची शक्यता असून काही अडचण आल्यास खा. ओमराजे निंबाळकर यांच्या 8668577701 व माझ्या 7020870454 या क्रमांकावर तसेच आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, उस्मानाबाद 02472 225618, 02472 227301, आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, लातूर 09175405227 व आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, सोलापूर 09822515601 आणि सिच्युवेशन रुमचा टोल फ्री संपर्क क्रमांक 1800118797, फोन – 011-23012113/011-23014104/011-23017905, फॅक्स नं. 011-23088124 व ई-मेल situationroom@mea.gov.in या मेलवर संपर्क साधण्याचे आव्हान केले आहे.

 
Top