उमरगा  / प्रतिनिधी-

  कु.अंकिता कुंभार हिच्या शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक  मदतीकरिता सामाजिक  कार्यकर्ते यांचे सहकार्य व अखिल भारतीय प्रजापती महासंघ व अखिल महाराष्ट कुंभार समाज विकास संस्था यांच्या वतीने विनंती  वजा आवाहन केल्याप्रमाणे  संघटनेचे सर्व  पदाधिकारी,कुंभार  समाजातील नौकरदार,व्यापारी,उद्दोग धंदा करणारे उद्योजक, व समाजातील प्रतिष्ठीत मंडळी कार्यक्रमास उपस्थिती नोंदवुन  आपल्या समाजातील कुमारी कुंभार अंकिता बालाजी रा. नितळी ता. उस्मानाबाद हिचा एम .बि.बि एस्.साठी श्रीपतराव भोसले  उस्मानाबाद  एम .आय.टी.  महाविद्यालयात शिक्षण घेत असुन  शिक्षणाचा भार उचलण्यासाठी दि.१० फेब्रुवारी  सायंकाळी  ५ वा.”सहकार सिद्धी” हाॅल उस्मानाबाद येथे बैठक घेण्यात आली.

यावेळी अंकिताचा शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार कण्यात आला त्यानंतर मान्यवरांचा अखिल महाराष्ट कुंभार समाज विकास संस्था (रजि)तर्फे यथोचित  सत्कार संपन्न करण्यात आला. व्सासपीठावरिल मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व अंकितास सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. यामध्ये प्रमुख उपस्थिती  अनंत कुंभार   उपमुख्य कार्यकारी जि.प.उस्मानाबाद व सौ.रोहिणी कुंभार  गटशिक्षणाधिकारी  हे होते तर अध्यक्षस्थानी  नागनाथ कुंभार होते.विशेष अतिथी महादेवराव खटावकर,खामकर मामा ,बळवंत घोगरे आदि उपस्थित होते.

कु. अंकिताला मदत करण्यासाठी अखिल भारतीय प्रजापती महासंघ व अखिल महाराष्ट कुंभार समाज विकास संस्था (रजि)यांच्या तर्फे पुढील शेक्षणीक  खर्चाची जबाबदारी स्विकारली व वैयक्तीक अंकितास  सेवा सहयोग निधि ठाणे संस्थेच्या वतिने दोन लाख तर अनंत क़ुंभार यांनी  पंचेविस हजार रू फोन पे  जमा केले व मरग्याचे उद्योजक  नागनाथ कुंभार यांनी पंचेविस हजार रु रोख रक्कम दिली .खामकर मामा यांनी  पाच हजार रु .दिले उर्वरित रक्कम उपस्थित समाज बांधव जमा करून अंकितास  देण्याचे  मान्य  केले .बालाजी कुंभार यांनी रु१०१११/ फोन पे  जमा केले संघटनेच्या माध्यमातून  अंकितास रक्कम रूपये ४१६८११/-जमा झाली आसुन यापुढील कालावधी मध्ये उस्मानाबाद येथे समाजातील गोर गरीब विद्दार्थ्यासाठी वस्तीगृह बांधण्यासाठी संघटनेच्या प्रयत्न केले जातील असे महादेवराव खटावकर यांनी सांगीतले बैठकीमध्ये सांगितले.

 सजातील अधिकारी व  कर्मचारी यांनी मिळून दरमहा विशिष्ठ रक्कम ग्रुप खाते काढून जमा करण्याचे एकमताने ठरविले.याचा उपयोग फक्त शैक्षणिक खर्चासाठीच करावयाचा आहे असे ठरविण्यात आले असुन  सुत्रसंचलन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगीराज कुंभार यांनी केले व आभार  नामदेवराव कुंभार यांनी मानले .सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी  लिंबराज कुंभार,भगवानराव कुंभार, अमृत कुंभार यांनी अथक परिश्रम घेतले.


 
Top