उमरगा / प्रतिनिधी-

तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तलाठी कार्यालय परिसरात सरपंच तथा राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षा सुनिता पावशेरे, जेष्ठ नागरिक त्र्यंबक मुसांडे, अशोक सुर्यवंशी , पल्लवी डोणगावे,यशोदा गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते देविदास पावशेरे, राष्ट्रवादीओबीसी सेल उमरगा तालुका उपाध्यक्ष मारुती सुरवसे, पल्लवी डोणगावे, पल्लवी पाटील, कोतवाल यशोदा गायकवाड,कृषी मित्र गहिनीनाथ बिराजदार, प्रभाकर बिराजदार, त्र्यंबक मुसांडे,प्रभाकर घोटमाळे, तुकाराम बिराजदार,लखन ईटकर पंडीत मुसांडे, प्रेमचंद नोगजा, अरविंद दळवे आदी नागरिक महिला युवक उपस्थित होते.


 
Top