लोहारा/प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने लोहारा पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची व शिवजयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातील व तालुक्यातील नागरीकांनी आरोग्य शिबिर घेऊन व प्रतिमा पुजन करुन सोशल डिसटंट पाळुन कार्यक्रम घेऊन शिवजयंती शांततेत साजरी करुन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी पो.नि.सुनिलकुमार काकडे यांनी यावेळी केले. 

यावेळी अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, नगरसेवक अमीन सुबेकर, गौस मोमीन, आरिफ खानापूरे, कृ‌.उ.बा. स. माजी सभापती दयानंद गिरी, आयुब अब्दुल शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, बाळासाहेब पाटील, माजी पं.स. सदस्य दिपक रोडगे, ओम कोरे, के.डी.पाटील, शब्बीर गवंडी, पत्रकार कालिदास गोरे, गणेश खबोले, ओम पाटील, सचिन माळी, नैमोद्दीन सवार  उपस्थित होते.


 
Top