तुळजापूर (प्रतिनिधी)

 छञपती शिवाजी महाराज यांच्या  ३९२व्या  जयंतीनिमित्ताने श्री तुळजाभवानी मंदीरात सकाळी सहा वाजता  देविजीस दुग्धअभिषेक करण्यात आल्यानंतर वस्ञोलंकार घालण्यात आले. नंतर भवानीतलवार अलंकार महापुजा देविजींचा सिंहासनावर मांडण्यात आली.ही महापुजा पाहण्यासाठी शिवप्रेमी भाविकांनी मंदीरात गर्दी केली होती.

सकाळी घरोघरी शिवप्रैमींनी छञपती शिवाजी महाराज प्रतिमा पुजन करुन सहकुंटुंब अभिवादन केले. सकाळी दहा वाजता   छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धअभिषेक  व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आ.राणाजगजितसिंहपाटील व मंहतांचा हस्ते  शिवप्रेंमीनी एकञित जमुन जयभवानी जयशिवाजीच्या घोषाणा देत अभिवादन केले .यावेळी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थितीत होते.   शिवजयंती पार्श्वभूमीवर शहरात सर्वञ भगवे ध्वज लावुन स्वागत कमानी लावल्याने शहर भगवे मय झाले होते.


 
Top