तुळजापूर / प्रतिनिधी - श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ गानसम्राज्ञी लता मंगेशकर दोन वेळी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन यथासांग पुजा केली होती.

 गानसम्राज्ञी लता मंगेशकर  तिर्थक्षेञ तुळजापूर ला देवीदर्नशनार्थ येताना साडीचोळी खननारळ ओटीसह पुजेचे  साहित्य स्वताहा मुंबई येथुन खरेदी करुन आणत येथे आल्यानंतर त्या देविजीचे मुख्यभोपेपुजारी कै. माणिकराव कदम यांच्या कडुन पुजाअर्चा करुन घेत 

गानसम्रानी लता दिदी प्रचंड धार्मिक वृतीचा होत्या स्वरदेवते बरोबरच त्यांची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेवर अपार श्रध्दा होती पण व्यस्त  कार्यक्रम व वयोमानामुळे त्यांना तिर्थक्षेञी तुळजापूर ला येणे जमले  नाही

गानसम्राज्ञीलता मंगेशकर यांनी प्रथम1962ला  देविजींचे पहिल्यांदा दर्शन घेतले नंतर त्यांनी मंदीरात स्वताचा आवाजात देवीजींची  आरती  गावुन देवीचरणी स्वररुपी सेवा अर्पण केली 

त्यानंतर १७ फेब्रुवारी१९९४ रोजी   गानसम्रानी लतादीदी ' भाऊ हदयनाथ व बहीण उषा मंगेशकर  आशा भोसले सोबत येवुन देवीजींचा कुलधर्मकुलाचार केला हे देवीदर्शन त्यांचे अखेरचे दर्शन ठरले , अशी माहीती भोपे पुजारी अँड धिरज पाटील यांनी दिली.

 
Top