उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील उंबरे कुटुंबाची देशभक्ती गौरवास्पद अशी आहे. त्यांच्या कुटुंबातील सख्खे तीन भाऊ सैन्यात होते. सीमा सुरक्षा दलामध्ये सेवा बजावलेले सबइन्स्पेक्टर अशोकराव उंबरे यांची तब्बल 39 वर्ष देशसेवा उस्मानाबाद जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी काढले.

उस्मानाबाद शहरातील उंबरे कोठा येथील अशोकराव उंबरे यांचा सैन्यातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सेवागौरव समारंभ शनिवारी दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खा. राजेनिंबाळकर बोलत होते. भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, हभप अ‍ॅड. पांडुरंग लोमटे, हभप बाबूराव पुजारी, युवासेनेचे नेते तथा माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, माजी जिप सदस्य रामदास कोळगे, तेरणा पब्लिक स्कुलचे सचिव अनंतराव उंबरे, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे, बारा बलुतेदार संघटनेचे नेते धनंजय शिंगाडे, अतुल बागल, सुभाष पवार, नंदकुमार शेटे, भोसले हायस्कुलचे माजी उपमुख्याध्यापक अशोक उंबरे, चर्मकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. गणपती कांबळे, जोतीराम भातभागे, सचिन टापरे, मुख्याध्यापक विलास बचाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, अशोकराव उंबरे हे सेवानिवृत्त जरी झाले तरी त्यांच्यातील सैनिक जिवंत राहील आणि यापुढेही सामाजिक कार्यात झोकून कार्य करतील. एवढ्या मोठ्या सैनिकांचा सत्कार करण्याचे मला भाग्य मिळालं. त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नीचा हि देश सेवेसाठी खुप मोठा वाटा आहे. त्यांचे पुढील आयुष्य उत्तम आरोग्य आनंददायी भरभराटीचे जावो, या जिल्ह्याचा खासदार या नात्याने जिल्हावासिंयांतर्फे शुभेच्छा देतो.

भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे म्हणाले की, आम्हाला सैनिकांविषयी कायम अभिमान वाटतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन रँक, वन पेंशन राबविल्यामुळे देशातील सैनिकांना न्याय देण्याचं काम केलं. तुमचा आम्हाला कायम अभिमान राहील. अशोक उंबरे यांच्या कार्याला, शौर्याला कार्यकर्तृत्वाला सलाम, देशाच्या प्रत्येक सीमेवर त्यांनी देशाची सेवा केली. जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे. युवासेनेचे सुरज साळुंके म्हणाले, तुमच्यासारख्या कार्यतत्पर देशभक्तांचा सत्कार करणं आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे. तुमच्या कुटुंबाचे देशसेवेसाठी अतुलनीय असे काम आहे. तुमच्या परिवारातील सदस्य असणं आम्हांसाठी गौरवास्पद बाब आहे.

कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उंबरे परिवारातील सदस्य, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक नानासाहेब सावतर यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. सुभाष कदम यांनी आभार मानले.

 
Top