उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एफसीआय मार्फत उस्मानाबाद जिल्हयात दि. 16 फेब्रुवारी-2022 पासून NEML पोर्टलवर हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.उस्मानाबाद जिल्हयात एफसीआयकडून 15 हरभरा खरेदी केंद्र मंजूर केली आहेत.

   खरेदी केलेल्या शेतक-यांच्या FAQ हरभराला प्रती क्विंटल 5 हजार 230 रूपये दर देण्यात येणार आहे. हरभरा उत्पादक शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी . 7/12 उतारा आणि त्यावर हरभरा पिकांची नोंद असणे आवश्यक आहे. आधारकार्ड, बॅक पासबुकची झेरॉक्स ( बॅक अकॉऊट नंबर व IFSC CODE स्पष्ट असावा) या कागदपत्राची आवश्यकता आहे.

 
Top