उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण  आणि मुंबई येथील राज्य विधी  सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे येत्या 12 मार्च 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत अयोजित करण्यात येणार आहे.

न्यायालयीन प्रलंबीत, तसेच  वादपूर्व  प्रकरणांमध्ये  झटपट  न्याय निर्णय  व्हावेत, या उद्देशाने या  लोकअदालतीमध्ये दिवाणी प्रकरणे,तडजोड पात्र फौजदारी खटले,मोटार अपघात प्रकरणे,कौटुंबिक वाद प्रकरणे, धनादेशाची प्रकरणे,जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची तडजोडीस पात्र प्रलंबीत प्रकरणे तसेच मोटार  वाहन भंगाची वाहतूक शाखेची दाखल पूर्व प्रकरणे समेटासाठी पक्षकारांनी पुढे यावे आणि लोकअदालतीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायधीश तथा जिल्हा सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष के.आर. पेठकर, वरिष्ठ न्यायधीश तथा जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांनी केले आहे.


 
Top