उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत पंचायत समिती सेस फंडातून 2021-2022 या वर्षामध्ये  वीस टक्के समाजकल्याण निधी दोन लाख 46 हजार रुपये तरतुदीमधून उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील इयत्ता दहावी आणि बारावी वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना टँब खरेदीसाठी प्रती लाभार्थी दहा हजार रुपये अनुदान तसेच पंचायत समिती सेस पाच टक्के दिव्यांग योजना रक्कम  17 हजार रुपये तरतुदीमधून उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अतितीव्र दिव्यांगाच्या पालकांना प्रती लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये अनुदान या योजना राबविण्यात येत आहे.पंचायत समिती कार्यालयामध्ये अर्ज उपलब्ध आहेत.दि.10 फेब्रुवारी-2022 रोजी पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.असे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

 
Top