उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 रुपामाता उद्योग समूहाचे सर्वेसर्वा ॲड. व्यंकटराव गुंड यांचा ५६ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी ५ जानेवारीला साजरा करण्यात आला.यावेळी भव्यदिव्य सत्कार कार्यक्रमानंतर नम्रपणाने आपली भूमिका मांडताना ॲड.गुंड म्हणाले,मी आज ५६ वर्षांचा झालो आहे, पण मी आजही तरुणासारखे काम करत आहे,मी कोणत्याही दिवशी सुट्टी घेत नाही, वर्षाचे 365 दिवस मी कार्यरत असतो” असे आपल्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात  बोलताना रुपामाता उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.व्यंकटराव गुंड पाडोळीकर यांनी सांगितले.

  पडोळी(आ) व टाकळी जि.उस्मानाबाद, तसेच समर्थ हॉटेल उस्मानाबाद येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, रक्तदान शिबिरात १३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले,

    शिबिर यशस्वी करण्यासाठी सह्याद्री ब्लड बँक, उस्मानाबाद यांचे विशेष सहकार्य लाभले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय सोनटक्के, ॲड.शरद गुंड, प्रसन्न देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.जिल्हा परिषद प्रशाला,टाकळी येथे गुंड यांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना गूळ पावडर व रुपामाता कॅलेंडरचे वितरण करण्यात आले. तसेच पाडोळी गावामध्ये प्रत्येक घरोघरी एक किलो गूळ पावडर व रुपामाता संस्थेचे कॅलेंडर वाढदिवसानिमित्त भेट देण्यात आले.

पाडोळी येथील रुपामाता नॅचरल शुगर्स, येथे ॲड.गुंड यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना गुंड यांनी, “ज्या भूमीत मी शिकलो, नंतर वकील म्हणून परत पडोळी तेथे आलो, तेथील लोकांसाठी, शेतकऱ्यासाठी रुपामाता मिल्क आणि नॅचरल शुगर्स ची मुहूर्तमेढ रोवली तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची सुविधा मिळावी म्हणून मी दहावीपर्यंत शाळेची सोय करून दिली, कारण मी शाळेत असताना अनंत अडचणी आल्या. तसेच माझे थोरले बंधूं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी यांच्या इच्छेखातर वकिली व्यवसाय निवडला” असे सांगितले.

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, तसेच गरीब शेतकऱ्यांना मदत म्हणून, मी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका दुष्काळी भागात कारखाना चालवू शकलो कारण तुमच्या सर्वांचे प्रेम, ऊर्जा मला अविरत कार्यासाठी प्रेरणा देते. पुढील काळात अनेक कामे मला करायची आहेत, रुपामाता हा ब्रँड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता, पूर्ण राज्यभर न्यायचा आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, पाडोळीचे उपसरपंच बाबुराव पुजारी, रुपामाता मनोरमा शुगर्सचे संजय पटवारी, प्रसिद्ध उद्योजक नाना लोमटे, लातूर मल्टीस्टेटचे बावणे, कुदळे ,दत्तात्रय सोनटक्के उपस्थित होते. याप्रसंगी रुपामाता नॅचरल शुगर्स, रुपामाता मिल्क,पाडोळी, तसेच विविध कार्यकारी सोसायटी पाडोळी यांच्यातर्फे संयुक्तपणे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सूर्यकांत गरड , रुपामाता नॅचरल शुगर्स, शिलवंत मुख्य अभियंता शेतकी अधिकारी कारभारी, सुरक्षा अधिकारी थोडसरे, इंजिनिअर संदीप गुंड, मुख्याध्यापक मनसुळे उपस्थित होते.

वाढदिनानिमित्त बाबळसुर, ता उमरगा येथे रुपामाता दूध संकलन व शीतकरण केंद्राचे उद्घाटन रुपामाता नॅचरलचे व्हाईस चेअरमन सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उस्मानाबाद येथील रुपमाताच्या प्रधान कार्यालयात  वाढदिवस साजरा करण्यात आला, या प्रसंगी रुपामाता अर्बनचे सीईओ सत्यनारायण बोधले, रुपामाता मल्टिस्टेट चे सीईओ खांडेकर , रुपामाता उद्योग समूहाचे ॲड. अजित गुंड पाटील, तसेच कर्मचारी हजर होते.  श्री.समर्थ हॉटेल येथे मान्यवर निमंत्रितांच्या उपस्थितीत ॲड. गुंड यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आपले मनोगत व्यक्त करताना, सर्वांचे प्रेम, तसेच  अपुलकीमुळे भारावून गेलो आहे,आपला स्नेह यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.       सर्व समाजाचा मी ऋणी आहे, आपले ऋणानुबंध असेच कायम रहावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्व मान्यवर मंडळींनी ॲड गुंड यांना दीर्घायुष्य मिळो तसेच भावी वाटचाल यशस्वी होवो अशा स्वरूपातील शुभेच्छा दिल्या.

        यावेळी उस्मानाबाद शहराचे माजी नगराध्यक्ष मधुकरराव तावडे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी पंचायत समितीचे बांधकाम उपसभापती प्रदीप शिंदे,भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळे, उस्मानाबादचे माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, भाजप डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पवार, जेष्ठ विधिज्ञ ह भ प पांडूरंग लोमटे महाराज, संचालक शंकर गाडे, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, ,CA दीपक भातभागे, CA.प्रवीण प्रजापती, पवनराजे लोकसमृद्धी चे CEO मुखीम सिद्दीकी, प्रभाकर लोंढे, उद्योजक सोमनाथ जाणते,युवा उद्योजक आकाश तावडे,ॲड शरद गुंड उपस्थित होते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर,रुपामाता उद्योग समूहाचे कर्मचारी, हितचिंतक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

 
Top