परंडा/ प्रतिनिधी - 

विद्यार्थ्यांना प्रसारण आणि पत्रकारितेमध्ये मोठ्या संधी उपलब्ध असून त्या संधीच सोनं विद्यार्थ्यांनी करावे.पत्रकारितेमध्ये इनपुट आउटपुट या दोन विभागांमध्ये विद्यार्थ्यास संधी आहेत.वृत्तवाहिन्या मध्ये कॅमेरामन ,अँकरिंग, रिपोर्टिंग अशा विविध विभागांमध्ये करिअर करून समाजामध्ये परिवर्तन करू शकता असे मत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा .गे . शिंदे महाविद्यालय परंडा जिल्हा उस्मानाबाद येथे प्रसारण आणि पत्रकारिता विभाग आयोजित ऑनलाईन दर्पण दिन कार्यक्रमात व्यक्त केले. महाविद्यालयातील बी.होक विभागामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.दिपा सावळे या उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. महेशकुमार , डॉ. थोरात, प्रा संतोष काळे आणि डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैशाली थोरात यांनी केले.

यावेळी डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांची पत्रकारिता व त्यांच्या समस्या या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना प्रसाद काथे म्हणाले की आपण जसे इतरांना त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी विचारपूस करतो तसे पत्रकारांना कोणी विचारत नाही.त्यांना पगार किती आहे त्यांचं घर कसं चालतं याचा कोणीही विचार करत नाही.पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाच्या चांगल्या वाईट घटना समोर मांडतात  लिहितात तेव्हा त्यांना अनेक वेळा संघर्ष करावा लागतो.

    अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.दीपा सावळे म्हणाल्या की पत्रकारांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, त्यांना आपले कर्तव्य पार पाडताना अनेक अडचणी येतात त्या अडचणी पत्रकार कोणाला सांगत नाहीत.ते समाजाचा पारदर्शक आरसा आहेत. त्यांच्या उपजीविकेचे साधन अर्थात इतर कर्मचाऱ्यांना तसा पगार मिळतो तसा त्यांना मिळत नाही तेव्हा त्यांचा विचार झाला पाहिजे.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर प्रा.डॉ.प्रकाश सरवदे यांनी आभार मानले.यावेळी विद्यार्थी, पत्रकार व प्राध्यापक ऑनलाइन उपस्थित होते.

 
Top