उस्मानाबाद / प्रतिनिधी-

घाटंग्री व गडदेवदरी परिसरातील निसर्गरम्य वातावरणात जेतवन बुद्ध महाविहाराची उभारणी होत असुन यातील सामाजिक सभागृहास आ. कैलास पाटील  यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतुन पंचवीस लाख रुपये निधी दिला होता या सामाजिक सभागृह बांधकामाचा शुभारंभ उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

शहरातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुज्य भंते सुमंगल,गोविंदो मानंदो,सुमेध व खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमात मान्यवरांना भारतीय संविधान ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.प्रमुख धम्मदेसना पु.भदंत सुमंगल (कपिल नगरी,कराळी) पु.भदंत सुमेधजी नागसेन (बुद्ध लेणी खरोसा) तर बांधकामाचा शुभारंभ उस्मानाबादचे खासदार ओमदादा राजे निंबाळकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे आमदार .कैलास पाटील,तसेच प्रमुख पाहुणे मा.अस्मिताताई कांबळे, अध्यक्ष,जिल्हा परिषद उस्मानाबाद,दिग्विजय कैलास शिंदे,समाज कल्याण सभापती,डीसीसी बँकेचे अध्यक्ष कैलास शिंदे,माजी आमदार  दयानंद गायकवाड प्रमुख उपस्थिती मध्ये रणजित शिंदे,सरपंच,ग्रामपंचायत घाटंग्री, सचिन जाधव,शाम जाधव, नितिन शेरखाने, उपसरपंच ग्रामपंचायत घाटंग्री.शहाबाई कांबळे,सरपंच ग्रामपंचायत गड देवदरी,भाग्यश्री खताळ,उपसरपंच ग्रामपंचायत गड देवदरी,, नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे, प्रविण कोकाटे, शाम जाधव, भिमाआणणा जाधव, विजयबापु सस्ते, नितीन शेरखाने,राजाभाऊ ओव्हाळ, गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,विवेक साळवे,धनंजय वाघमारे, मेसा जानराव, धर्माचारी सुरेश लोढे, पप्पू गायकवाड सिद्धार्थ बनसोडे अँड इंदजीत शिदे,अंकुश उबाळे, कार्यक्रमाचे निमंत्रक  पी एम सोनटक्के  यांनी केले होते.कार्यक्रम कोव्हिड -१९ प्रतिबंधक नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पृथ्वीराज चिलवंत यांनी केले तर आभार श्री शिंदे यांनी मानले.कार्यक्रमास महिला भगिनी बांधव उपस्थित होते.


 
Top