तुळजापूर / प्रतिनिधी

 तुळजापूर पासून काही अंतरावर पाचुंदा तलावामध्ये मद्यपेय (दारू) घेऊन निघालेली ट्रक झोपीत ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने ट्रक सरळ पाचुंदा तलावात साधारणत पंधरा फूट  गेल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही .

  दिं.१७ जानेवारी रोजी धर्माबाद मधून कोल्हापूरकडे निघालेली ट्रक (क्र. TS- 18-T-5623) तुळजापूर शहरातील पाचुंदा तलावाजवळ पहाटे साडेचारच्या सुमारास आला असता झोपीत ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला डाव्या तलावामध्ये अंदाजे सहा ते दहा फूट खुल पाण्यामध्ये ट्रक बुडला गेला .सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही .चालक अनिल महादेव हिंगमिरे (रा. देगलूर ) व किन्नर रमेश भारत खरपडे हे दोन जण सुखरूप पणे पाण्यामधून बाहेर आले.तर सदर अपघात होताच काही मध्य प्रेमी दारुसाठी सदर अपघातस्थळी पाहायला मिळाली .परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे मध्यप्रेमींना काही मध्य पेय दारू काढता आलं नाही.परंतु सदर अपघातामध्ये दारूची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद,सहाय्यक पोलिस निरीक्षक कविता मुसळे, पोलिस हवालदार विजय राठोड, पोलीस कॉन्स्टेबल अजित सोनवणे,पोलीस कॉन्स्टेबल शिव शंकर पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले .


 
Top