तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे डॉ चंद्रकलादेवी पद्मसिंहजी  पाटील यांच्या स्मृति प्रित्यर्थ महाराष्ट्र संत विद्यालयाच्या प्रांगणात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यिनीसाठी संयोजक नरहरी बडवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत मुलांमध्ये रसाळ साहिल धर्मराज , फासे सुशांत पद्मभूषण ,

माळी ज्ञानेश्वर विनायक ,  मुलींमध्ये  योगेश्वरी दादासाहेब खांडेकर , वैष्णवी बिभीषण वाघ, धुपेकर आरती सिध्देश्वर यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. प्रारंभी मुख्याध्यापक एस. एस .बळवंतराव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले .यावेळी पर्यवेक्षक एम. एन .शितोळे , प्रा. सतिश भालेराव , प्रा सुर्यकांत खटिंग , प्रदिप कोकाटे , दयानंद फंड , गोरख माळी आदि उपस्थित होते. यावेळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , कलाशिक्षक एस. टी. गांगुर्डे , ए. डी. राठोड यांनी परिश्रम घेतले.

 
Top