उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील जुन्या पिढीतील समर्थ विचारांच्या अभ्यासिका श्रीमती विमल वासुदेवराव शहापूरकर यांचे   बुधवारी वयाच्या (96) व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. 

उस्मानाबाद शहरात समर्थ उपासक अनंतदास महाराज यांचे स्मारक उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पन्नास वर्षांपूर्वी उस्मानाबाद शहरातील महिला मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं होतं. श्री अनंतदास महाराज  स्मारक मंडळाच्या विश्वस्त म्हणूनही त्यांनी अनेक वर्षांपासून कार्यरत होत्या. गोरक्षण हा  त्यांच्या आस्थेचा विषय होता.  श्री अनंत  दास महाराज स्मारक मंडळाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या अनेक आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला . त्यांच्या पार्थिव देहावर आज बुधवारी सायंकाळी उस्मानाबाद येथे कपिलधार स्मशानभूमीत सायंकाळी  अंत्यविधी करण्यात आले.

 त्यांच्या पश्चात त्यांना आणि चार मुले एक  मुलगी नातवंडे असा परिवार आहे. उस्मानाबाद शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर अभय शहापूरकर यांच्या त्या मातोश्री होत्या. तर सोलापूर इथल्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभाग प्रमुख डॉक्टर माया पाटील यांच्या त्या मातोश्री होत.  

 
Top