उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 सौ प्रेमाताई सुधीर पाटील नगरसेविकां न.प. उस्मानाबाद तथा सचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या पुढाकाराने  श्रीपतराव भोसले हायस्कूल या ठिकाणी लसीकरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या लसीकरणाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.

 त्यामध्ये 15 वर्षे ते 18 वर्षे वयोगटातील मुला मुलींचे  लसीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी 660 जनांचे लसीकरण आज पार पडले. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आदित्य सुधीर पाटील , डॉ. लोखंडे मॅडम, डॉ. सुभाष वाघ उप प्रशासकीय अधिकारी संतोष घार्गे सर प्राध्यापक विवेक कापसे स्वप्नील पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

 
Top