उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भूम विकास सोसायटी प्रतिनिधी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर मोटे यांचेच दोन अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. केवळ छाननीत मोटे यांचे अर्ज वैध ठरला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सोमवारी १५ जागांसाठी १६४ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दोन उमेदवारी अर्जावर बँकेचे थकीत जामीनदार आहेत. असा आक्षेप आल्यामुळे अंतिम यादी २७ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे.
जिल्हयाच्या राजकारणात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठे महत्व आहे. त्यामुळे जिल्हयावर आपल्याच पक्षाची सत्ता प्रस्थापीत व्हावी, यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करीत आहेत. सध्या उस्मानाबाद जिल्हा बँक राष्ट्रवादी व भाजपच्या हातात आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १६४ अर्ज १५ संचालक मंडळाच्या जागेसाठी आले होते. त्यापैकी मधुकर मोटे यांचेच दोन अर्ज असल्यामुळे ते बिनविरोध निघाले. आज २५ जानेवारी रोजी झालेल्या छाननीमध्ये मधुकर मोटे यांचा अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे. विद्यामन संचालक सतीश दंडनाईक हे इतर बँकेचे संचालक असल्याचा आक्षेप होता तर नव्याने उमेदवारी भरलेल्या उमेदवारावर थकीत कर्जाचे जामीनदार असल्याचा आक्षेप आल्यामुळे यावेळी दोघाच्याही वकीलांनी आपआपले मुद्दे मांडले. त्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी अंतिम उमेदवारी यादी २७ जानेवारी रोजी जाहीर करणार असल्याचे सांगितले.
उस्मानाबाद जनता बॅकेंची नुकतीच झाली निवडणुक
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच झाली आहे. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक लागली आहे. त्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाकडे सहकार खात्याचे लक्ष लागले आहे.