उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दरवर्षी प्रमाणे  याही वर्षी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक विभागाच्या आयोजित कार्यक्रमात मतदार जनजागरण समिती उस्मानाबाद यांनी मुख्य निवडणुक आयोगाला काहि सुचना सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार गणेश माळी   यांच्या मार्फत निवेदनाद्वारे देण्यात आल्या आहेत.

  निवेदन देताना मतदार जनजागरण समितीचे अब्दुल लतिफ, गणेश रानबा वाघमारे तर या कार्यक्रमात नायब तहसीलदार एन.पी.मुगावे, नायब तहसीलदार राजाभाऊ केरूळकर,एस.टी.बोतेकर एम.के.काझी,संतोष गायकवाड,ए.सी.सालगुंडे, सुधीर आचार्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालयात घेण्यात आला.

 
Top