उस्मानाबाद / प्रतिनिधी :- 

मुंबई पोलीस अंतर्गत नायगाव मुंबई येथे श्रीमती सुजाता पाटील या सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यरत आहेत,अनैतिक व गैरकृत्यांना पाठिंबा न दिल्याने व भ्रष्टाचारात सहकार्य न केल्याने त्यांच्या खात्यातील सहकारी यांनी खाजगी लोकांना पाठिशी घालून त्यांना भ्रष्टाचारात अडकविले आहे, त्यांंच्यावर झालेल्या अन्यायाची सखोल चौकशी निरपेक्ष करून सरकारी व खासगी लोकांना शासन झाले पाहिजे अशी मागणी फोरम ऑफ सिटिझन उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनातुन करण्यात आली आहे.

यावेळी फुक संघटनेचे सचिव धर्मवीर कदम,शेख अलिमोद्दिन,नितिन शेरखाने, गणेश रानबा वाघमारे,रंगनाथ भोसले,शहाजी कापसे,पि के भारवाकर,लक्ष्मणराव धाकतोडे, पांडुरंग थोरात,श्री वाघमारे,रमेश बाराते अन्य इतर उपस्थित होते.

 
Top