उस्मानाबाद/ प्रतिनिधी :- 

भारतीय इतिहासातील एक सर्वोच्च पराक्रम म्हणजे भिमा कोरेगाव होय.स्वाभिमान,माणुस म्हणुन जीवन जगण्यासाठी न्यायासाठी झालेल्या लढाईतील विजयी गाथा म्हणजे भिमा कोरेगाव..हा दिवस भिमा शौर्य दिन म्हणुन साजरा केला जातो.भिमा कोरेगाव येथील जयस्तंभाची प्रतिकृती उभारून बुद्ध वंदना घेऊन शुर विरांना मानवंदना देण्यात आली.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील जिल्हा परिषदेच्या अधिनिस्त असलेली व तात्पुरते स्वरुपात समितीला देण्यात आलेल्या जागेत हा कार्यक्रम शासनाने लावलेल्या कोरोना नियमांचे पालन करुन घेण्यात आला.यावेळी भंन्ते गोविंदो,नगर सेवक तथा डिपीडिसी सदस्य सिध्दार्थ दादा बनसोडे,मृत्युंजय बनसोडे,शिलाताई चंदनशिवे,बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे, गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,प्रविण जगताप, स्वराज जानराव,अतुल लष्करे,संपतराव शिंदे, किशोर गायकवाड,श्री.चंदनशिवे,श्री.गांधले,बाबा कांबळे,प्रशांत आबा बनसोडे,आतिष बनसोडे,पोलिस विभागासहित अन्य इतर उपस्थित होते.

 
Top