उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा आखाडा लवकरच रंगणार आहे. प्रशासनाची निवडणूक पूर्वतयारी सुरू असून निवडणूक विभागाकडून निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमही मान्यतेसाठी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. आगामी दोन ते तीन दिवसात निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असल्याची माहिती िमळाली आहे.

जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण सत्ताकेंद्र असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महत्वाची मानली जाते.कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे जिल्हा बँकेची निवडणूक वेळेत होऊ शकली नाही. बँकेची निवडणूक पूर्व प्रक्रिया देखील काही काळ थांबविण्यात आली होती. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निवडणूक विभागाकडून जिल्हा बँकेची प्रारूप मतदार यादी जाहीर करून त्यावर आक्षेप मागविण्यात आले होते. मतदारयादी संदर्भात एकूण ३९ आक्षेप निवडणूक विभागाकडे धडकले होते. विभागीय सहनिबंधक यांनी सुनावणी घेवून हे आक्षेप निकाली काढले आहेत. त्यानंतर बुधवारी (दि. ५)८०८ मतदारांची अंतिम मतदारयादी केल निवडणूक विभागाकडून प्रसिध्द करण्यात वर्षा आली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्तीही जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सुनिल शिरापुरकर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी सहायक निबंधक माधव अंबिलपुरे व राजेंद्र शेंदारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करून मान्यतेसाठी विभागीय सहनिबंधक यांना सादर केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात त्यास मान्यता मिळताच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध राजकीय पक्षातील इच्छुकांनी जोरदार पूर्वतयारी सुरू केली आहे. नववर्षात नगर पंचायतनंतर जिल्हा बँकेची निवडणूक होणारअसल्याने सर्वच राजकीय पक्षांनी हे महत्वाचे आर्थिक सत्ताकेंद्र ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने व्युहरचना आखली आहे.


 
Top