उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

सहा प्रमुख मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दि. १८ जानेवारी रोजी दुपारी १ ते १.30 वाजण्याच्या सुमारास अंादेालन करण्यात आले. यावेळी मातंग समाजावरील अन्याय बंद झाला पाहिजे, विष्णुभाऊ तुम आगे बढो हम तुमारे साथ है, आदी प्रकारच्या घोषणा देऊन जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मांगण्याचे निवेदन सौपविण्यात आले.

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात  अमरावतीमध्ये ११ जानेवारी  २०२२ रोजी  दिवसाढवळ्या भरचौकात अज्ञात इसमाने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये जिल्हा उपरूग्णालयात बालरोग तज्ञ डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांची हत्या करण्यात आलेली आहे. अमरावती शहरामध्ये रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा व मातंग समाजाची अस्मिता डाॅ.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा जाणीवपुर्वक प्रशासनाने हटवलेला आहे तो तात्काळ बसविण्यात यावा,  डॉ. बाबासाहेब  फाउंडेशनचे अध्यक्ष विकास त्रिदेवी  यांनी जाणीपुर्वक पुर्वक साहित्यरत्न  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा समाजसुधारक, प्रबोधनकारांच्या यादीमध्ये नाव नसल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्याला तात्काळ निलंबित करावा,क्रांतीवीर लहुजी साठेे चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे,  समाजावरील महाराष्ट्रात होणारे अन्याय अत्याचार थांबवावेत या मागण्यासंदर्भात लहुजी शक्ती सेना उस्मानाबादच्या वतीने वाचा फोडण्यासाठी जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर एकदिवसीय निदर्शने आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शिवाजी गायकवाड, धनाजी वाघमारे, विजय क्षिरसागर, निखिल चांदणे, संतोष मोरे आंदीनी भाग घेतला होता. 

 
Top