तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुका प्रक्षेञ भेट अंतर्गत  मंगळवार दि.२५रोजी  हंगरगातुळ येथे थेट शेतकऱ्याचा  बांधावर जाऊन पेरु बागाची पाहणी करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

  क्षेत्रभेट दौरा अंतर्गत हंगरगा येथील  शेतकरी प्रवीण हंगरगेकर यांच्या पेरू बागेमध्ये पेरू छाटणी व्यवस्थापन,  कीड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन तसेच सचिन हंगरगेकर यांच्या आंबा बागेमध्ये मोहर व्यवस्थापन, चिंचोली येथील प्रशांत पवार यांच्या शेतामध्ये कलिंगड व स्वीट कॉर्न यांची ठिबक सिंचन पद्धती द्वारे लागवड केलेली क्षेत्राची पाहणी करण्यात आली व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 यावेळी  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यु काशीद, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील मंडलिक सर, झगडे सर,  कृषी विद्यावेत्ता डॉक्टर वसंत सूर्यवंशी , शास्त्रज्ञ मंडळ कृषी अधिकारी सर्वदे मॅडम,  अनिल जगदाळे, प्रवीण सरडे, कृषी पर्यवेक्षक गावडे, कृषी सहाय्यक अनिल पवार, नवनाथ  अलमले, रामभाऊ बर्डे, शिवकन्या राजमाने आदी उपस्थितीत होते.


 
Top