तुळजापूर / प्रतिनिधी-

 नादुंरी येथे जलशिवार अंतर्गत  बांधण्यात आलेल्या बंधारा कामात भष्ट्राचार झाला आहे. त्याच्या चौकशीच्या मागणीसाठी  आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती वतीने  मंगळवार दि.१८ रोजी येथील लघु पाटबंधारे कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतुन आत्महत्या करण्याचा   प्रयत्न केला असता तात्काळ  पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

 तुळजापूर येथे संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष यादव , तालुकाध्यक्ष गणेश पाटील , तालुकाउपाध्यक्ष सागर काळे,तालुका सचिव अथिलेश पुराणिक,शहर अध्यक्ष निखील अमृतराव, शहर उपाध्यक्ष आनंद शिरसाठ  यांनी  परिषद लघु पाटबंधारे कार्यालय तुळजापूर समोर आत्मदहनाचा प्रयत्न  करण्याचा प्रयत्न केला .यावेळी दोंघाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


 
Top