उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशान्वये येत्या दि.12 मार्च 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या लोकअदालतीचा उल्लेख राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे  देण्यात येणाऱ्या  जाहिरातीत शासनाच्या सर्व जाहिरातीत उल्लेख करावा असे निर्देश महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने दिले आहेत, याबाबत येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणानेही आवाहन केले आहे .

  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित, कार्यकारी अध्यक्ष,विधि सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष यांच्यासमवेत घेतलेल्या बैठकीत मागच्या राष्ट्रीय लोकअदालतीच्या वेळी काही राज्यांमध्ये शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या शासकीय जाहीरातींमध्ये येणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीबाबत तळटीप देण्यात आली होती.    

  त्यामुळे राष्ट्रीय लोक अदालतीबाबत लोकांमध्ये जनजागृती झाली. त्याच अनुषंगाने  महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती ए .ए .सय्यद  यांनी महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागामार्फत महाराष्ट्र राज्यासाठी ज्या जाहिराती दैनिक वृत्तपत्रामध्ये दिल्या जातात, त्या जाहिरातीमध्ये “महाराष्ट्र विधि सेवा प्राधिकरण, मुंबई मार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे नियोजन केले आहे.” अशी टीप प्रत्येक जाहीरातीमध्ये देण्यात यावी. अशा प्रकारे टीप दिल्यास राष्ट्रीय लोक अदालतीबाबत लोकांमध्ये जनजागृती होईल,तसेच त्याचा फायदा हा न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या कमी करण्यामध्ये होईल.

   तसेच व विधि सेवा प्राधिकरण अधिनियम, १९८७ मधील तरतूदी अंतर्गत नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरणाच्या  आदेशाप्रमाणे, महाराष्ट्र राज्य सेवा विधि सेवा प्राधिकरण  संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका,जिल्हा आणि उच्च न्यायालयात भविष्यात वेळोवेळी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करील, त्या-त्यावेळी त्या लोकअदालतीची तारीख सर्व विभागांना वेळोवेळी कळविण्यात येईल. त्याप्रमाणे सर्व विभागांनी उपरोक्त निदेशांनुसार आपल्या विभागांच्या जाहिरातीत तळटीप देण्याची कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे संदर्भाधीन दि. ०३ डिसेंबर २०२१ रोजीच्या पत्रातील दि. ११ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या लोक अदालतीसाठी देण्यात आलेल्या सूचनांनुसार आताही दि.12 मार्च 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची टीप विभागामार्फत आणि त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय जाहिरातींमध्येही देण्यात यावी,असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश  तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि  प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांनी केले आहे.


 
Top