उस्मानाबाद / प्रतिनिधी-

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली. योजनेमध्ये जिल्हयातील उस्मानाबाद शहरातील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल आणि उमरगा येथील डॉ. के. डी. शेंडगे इंग्लिश स्कूल या दोन शाळांची निवड झाली. या शाळांमध्ये ३१ जानेवारीपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त बी. जी. अरावत यांनी केले

योजनेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना सोई-सुविधा मोफत उपलब्ध आहेत. शाळेत या योजनेअंतर्गत यापूर्वी पाहिली आणि दुसरी वर्गासाठी अर्ज मागवले होते. सुधारीत शासन पत्रक १२ जानेवारी नुसार आता इयत्ता तिसरी ते पाचवी वर्गात प्रवेश घेण्याकरिता ३१ जानेवारी २०२२ ही अंतिम दिनांक देण्यात आली आहे.

प्रवेश घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज करावे लागणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णयानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना सर्व टप्प्यावर प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज या कार्यालयाकडे उपलब्ध आहे. त्यासाठी जातीचा दाखला, जन्माचा दाखला, पालकाचे उत्पन्न, इत्यादी कागदपत्रे जोडून अर्ज या कार्यालयाकडे विहीत मुदतीमध्ये सादर करावा.


 
Top