तुळजापूर  / प्रतिनिधी-

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद  निवडणुकीत  युवा सेनेला जास्तीत जास्त  जागा मिळवुन घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे मनिषा वाघमारे (युवासेना सहसचिव) यांच्या अध्यक्षतेखाली युवासेना तालुकाध्यक्ष प्रतिक रोचकरी यांच्या  प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि २० रोजी युवासेनेच्या  झालेल्या   बैठकीत  घेण्यात आली.

प्रारंभी या बैठकीत युवा सेनेचा तालुकास्तरीय  आढावा घेण्यात आला नंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्या नगरपरिषद निवडणुक बाबतीत सविस्तर चर्चा होवुन युवा सैनिकांनी डोर-टु-डोर जावुन शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे ठरले.पदाधिकारी नंतर युवा सैनिकांची बैठक ही लवकर घेण्याचे या बैठकीत ठरले महाविकासआघाडी शी युती नाही झाली तर स्वबळावर लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस  प्रतिक रोचकरी युवासेना तालुका प्रमुख, सागर इंगळे युवासेना शहर प्रमुख विलास भोसले ,उपजिल्हा प्रमुख भ.वि.सेना नागेश बनसोडे (सरपंच), प्रदिप इंगळे युवासेना शहर कार्याध्यक्ष, भाग्यश्री रणखांब ,समिर शेक, किरण रेणके, सुरेश ठाकर, निरंजन मगर, प्रताप शिंदे, क्रुष्णा झाडपिडे, आदित्य काळे, आकाश साळुंके, छोटु घुगे, राहुल फंड, बालाजी पांचाळ , सिद्धाम कारभारी, कुणाल भोसले, भरत भोसले, रवि चव्हाण, महादेव पवार , प्रेम कदम, गणेश नवगीरे,प्रविण क्षीरसागर आदी पदाधिकारी उपस्थितीत होते. 


 
Top