उस्मानाबाद / प्रतिनिधी : -

उस्मानाबाद येथील प्रा.डॉ.गुणवंत बापू गडबडे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची  अर्थशास्त्र या विषयात नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली.

प्रा.गुणवंत गडबडे यांनी” A CRITICAL ANYALISIS OF HUMAN DEVLOPMENT AND ECONOMIC GROWTH OF INDIA” अर्थात भारतातील मानव विकास आणि आर्थिक वृद्धीचे टीकात्मक विश्लेषण या  विषयावर  आपले संशोधन  करून  संशोधनाचा प्रबंध डॉ.बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे सादर केला होता.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले सर्व शिक्षण पूर्ण केले आहे.आई-वडील दोघेही अशिक्षित, कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची होती.तरीही आपली मुलं शिकली पाहिजेत म्हणून मोलमजुरी करून मुलांना शिकवले आज प्रा डॉ गुणवंत गडबडे हे वसईच्या संत गोंन्सलो गार्सिया महाविद्यालयात अर्थशास्त्र विषय शिकवतात या संशोधनासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील अर्थशास्त्र विभाग,प्रा.डॉ.चंद्रकांत कोकाटे यांनी मार्गदर्शन केले आहे.प्रा डॉ गुणवंत गडबडे यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे ..


 
Top