चाकुर / प्रतिनिधी-

21 व्या शतकातील मानवाच्या मूलभूत गरजेत वाढ झालेली आहे म्हणजेच अन्न , वस्त्र , निवारा या गरजे बरोबरच मोबाईल ही अत्यावशक बाब बनली आहे. याच वाढत्या मोबाईल च्या प्रवाहा मध्ये शारीरिक खेळाकडे तरुणाई चा रोख कमी होतोय याचाच विचार करून कै. दत्तात्रय कर्डिले यांच्या स्मरणार्थ खुर्दळी (ता.चाकूर, जि.लातूर)गावातील जागरूक नागरिक म्हणून ओळखले जाणारे माजी सरपंच तथा कै दत्तात्रय कर्डिले यांचे पुत्र वैशंपायन कर्डिले यांनी स्वत:च्या शेतात तरुणांसाठी हॉलीबॉलचे मैदान उपलब्ध करून दिले आहे. या मैदानाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.

खासकरून तरुणांनी वाढत्या मोबाईल वापरातून बाहेर येऊन मैदानी खेळ-खेळून आपले शारीरिक स्वास्थ्य अबाधित राखावे या साठी वडिलांच्या यांच्या स्मरणार्थ शेतात हॉलीबॉल चे मैदान तयार करून युवकांना उपलब्ध  करुन दिले  असल्याचे माजी सरपंच कर्डिले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. दरम्यान  खेळासाठी मैदानं खुले  केल्या बद्दल सर्व खेळाडुनीं माजी सरपंच वैशंपायन कर्डिले यांचे आभार मानले.

 
Top