उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने  नेहरू युवा केंद्र कार्यालयात जिल्हास्तरीय युवा संमेलन उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद हिंगे माजी राज्य निर्देशक ने यु के होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जनक टेकाळे माजी उपसंचालक क्रीडा विभाग म राज्य यांनी फिजिकल फिटनेस व आनंदी जीवनासाठी खेळ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. प्रा डॉ केशव क्षीरसागर यांनी राष्ट्र विकासात युवकांची भूमिका या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तसेच गावाच्या विकासात युवा युवती मंडळांची भूमिका या विषयावर रामचंद्र कुळकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या विविध योजना या विषयावर श्रीमती भाग्यश्री बिले (आंतरराष्ट्रीय खेळाडू) जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.संघटन कौशल्य या विषयावर प्रा. ज्ञानेश्वर भोसले यांनी मार्गदर्शन केले. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीत होऊ घातलेल्या उपक्रमात विविध वक्त्यांनी आपले अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुणेश  उंबरदंड यांनी केले तर आभार प्रदर्शन विकास कुलकर्णी यांनी मानले.यावेळी कौशल्य विकास केंद्र आर से टी यांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैभव लांडगे, रवी सुरवसे, पुरुषोत्तम बेले,  विशाल वाकडे, प्रदीप साठे, रामेश्वर चौबे, श्याम वाघमारे, अमोल करदोरे,  सुनिता वाळके यांनी परिश्रम घेतले.


 
Top