उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून २६जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभा ऑनलाईन घेण्याबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲड. अजित खोत यांनी आज दि.२१ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

    दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये कोविडचे रुग्ण संख्या हजारोंच्या पार गेली आहे मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उस्मानाबाद यांनी ९ जानेवारी रोजी कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४  लागू केले आहे त्यामध्ये सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास जमाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे शासन निर्णयानुसार २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीसाठी बंधनकारक केल्यामुळे सदरील ग्रामसभा ही ग्रामस्थांच्या उपस्थितीत घेतल्यास जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये गावातील लोक एकत्र येऊन कोरोना चा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल या बाबीचा विचार करून बुलढाणा,अमरावती येथील जिल्हाधिकारी व मुख्याधिकार्‍यांनी २६ जानेवारी च्या ग्रामसभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे आदेश काढले आहेत त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २६ जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे आदेश देण्यात यावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे 

   या निवेदनावर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.अजित खोत,सचिव मुन्ना शेख,गोकुळ सोलनकर,कमलाकर ठवरे,सुभाष कदम,सतीश कावळे,रंगनाथ कावळे, प्रेम रणदिवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top