उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव यांची भाजपा जिल्हा कार्यालयात व्हर्चुअल रॅली फॉर माईक्रो डोनेशनची बैठक संपन्न झाली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांनी व्हीडीओ कॉन्फ्रेन्सींग द्वारे युवकांना बहुमोल मार्गदर्शन केले.

 देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पक्ष आपले राजकीय कार्यकर्ते व हितचिंतकांच्या योगदानाद्वारे निष्पक्षता व पारदर्शकतेच्या आधारावर करत असून पक्षाची विचारधारा सर्वव्यापी व सर्वस्पर्शी करत आहे.

 भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा.जगत प्रकाश नड्डा जी यांनी देशभरातील पक्ष कार्यकर्ते व हितचिंतकांना NaMo App च्या “माइक्रो डोनेशन” (अल्प देणगी) स्वरुपात कमीत कमी रु. 5 ते जास्तित जास्त रु.1000 चे योगदान देण्याचे आवाहन करत असतांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनते मध्ये पोहचुन देश सेवेच्या संकल्पनेतुन, समर्पण भावनेतुन दान द्यावे. व भारतीय जनता पार्टीचे कार्य व याचा हेतु लोकांपर्यंत पोहोचवावा, आत्मनिर्भर भारत संकल्पनेनुसार अनेक युवकांना विविध माध्यमातुन व्यवसाय, रोजगार या विषयी केंद्र सरकारच्या माध्यमातुन मोठया प्रमाणात युवक हे आत्मनिर्भर झाले आहेत.

 “माइक्रो डोनेशन अभियान” पूर्व पंतप्रधान भारतरत्न श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी 25 डिसेंबर रोजी सुरु होऊन आपले प्रेरणास्थान पं. दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी 11 फेब्रुवारी, 2022 पर्यंत सुरु राहील.

 सर्व “माइक्रो डोनेशन” कमीत कमी रु.5 ते जास्तित जास्त रु.1000 स्वरुपातील देणगी योगदान NaMo App च्या माध्यमातून व्हावे.   जिल्ह्यातील पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी व युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी माइक्रो डोनेशन द्वारे आपला निधी जमा करुन अभियानाचा शुभारंभ करावा. तसेच जास्तित जास्त कार्यकर्त्यांना निधी योगदानाच्या अभियानात जोडावे असे आवाहन युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांनी केले.

 या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी या NaMo App च्या माध्यमातुन माइक्रो डोनेशन समर्पन करुन सुरुवात करुन या बैठकीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव जिल्हयातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले की प्रत्येकाने देश सेवेच्या संकल्पणेतुन एक मजबुत भारत बनवन्याच्या दृष्टीकोणातुन आज नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमीत्त देणगी स्वरुपामध्ये आपले समर्पण योगदान द्यावे.

 या प्रसंगी सभापती पंडीतराव टेकाळे, उप नगराध्यक्ष तथा समनवयक अभय इंगळे,  जिल्हाउपाध्यक्ष अभिराम पाटील, ॲड.कुलदिपसिंह भोसले, आय टी जिल्हा संयोजक जगदीश जोशी, जिल्हा उपाध्यक्ष अमीत कदम, तालुका अध्यक्ष ओम नाईकवाडी, जिल्हा सचिव राज निकम, जिल्हा सचिव गणेश एडके, जिल्हा सह संयोजक आत्मनिर्भर सलमान शेख, पपीन भोसले, कोषाध्यक्ष रोहीत देशमुख, जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे, हिम्मत भोसले, ओंकार देशमुख, प्रसाद मुंडे, सागर दंडनाईक, विक्रम पाटील, सुनिल पंगुडवाले, शिवाजी पाटील, राहुल शितोळे, माळाप्पा झळके, देवकर श्रावन, सार्थक पाटील, सिध्दांत देशमुख व इत्यादी सहकारी उपस्थित होते.


 
Top