परंडा / प्रतिनिधी :- 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील  माजी विद्यार्थी व सध्या कार्यरत असलेले संगणक विभागाचे प्राध्यापक रोहित भाऊसाहेब दिवाने आणि गणेश कोळेकर यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या विद्यापीठाने घेतलेल्या 26 सप्टेंबर 20 21 रोजी च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.या परीक्षेत रोहित दिवाने यांनी उत्तीर्ण होऊन 146 मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केले. 

    रोहित दिवाने यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांच्या हस्ते रोहित दीवाने व त्यांचे पालक भाऊसाहेब दीवाने यांचा पुष्पगुच्छ शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

     कार्यक्रमाचे आयोजन संगणक विभाग प्रमुख डॉ. महेशकुमार माने आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले होते .यावेळी आई क्यू एसीचे चेअरमन तथा संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ महेश कुमार माने ,रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ अक्षय घुमरे ,ग्रंथपाल.डॉ.राहूल देशमुख ,गणित विभाग प्रमुख डॉ. विद्याधर नलवडे ,अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ .अरुण खर्डे ,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ संभाजी गाते, इंग्रजी विभागाचे प्रा.दीपक तोडकरी ,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ सचिन चव्हाण आधी कर्मचारी व प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.प्राध्यापक रोहित दिवाने हे सध्या संगणक विभागांमध्ये तात्पुरत्या मानधनावर कार्यरत आहेत.या महाविद्यालयातील कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब दीवाने यांचे ते चिरंजीवआहेत.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले.यावेळी प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी रोहित दिवाने यांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. 

 
Top