उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद उद्योग समुहाचे अध्यक्ष  व महाराष्ट्र भाजप कार्यकारणी सदस्य अॅड.व्यंकटराव गुंड यांचा बुधवार दि. ५ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाद्वारे उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. पाडोळी गावात गुंड यांच्या वाढदिवसानिमित्त ९० युवकांनी व महिलांनी महिलांनी रक्तदान केले.


रूपामाता उद्योग समुहाचे अध्यक्ष व भाजप नेते अॅड. व्यंकटराव गुंड यांनी आपल्या अथक परिश्रमातुन उस्मानाबाद तालुक्यात शून्यातून विश्व निर्माण केले. अॅड. गुंड यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पाडोळी, टाकळी, रूपामाता नॅचरल कारखाना, समर्थ हॉल उस्मानाबाद आदी ठिकाणी भव्य कार्यक्रम करण्यात आले. टाकळी व पाडोळी येथील जिल्हा परिषद प्रशालेत शक्तीवर्धक गुळपावडरचे वाटप करण्यात आले. बाबळसूर (ता.उमरगा) येथे रूपामाता समुहाच्या वतीने १० लीटरचे दुध शीतकरण केंद्र सुरू करण्यात आले. यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून रात्री उस्मानाबाद शहरातील समर्थ हॉल येथे रूपामाता उद्योग समुहाच्या वतीने  एड. गुंडयांचा  भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी विविध संस्थेच्यावतीने ही एड. गुंड यांचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रामास सत्यनारायण बोधले, मिलिंद खांडेकर, सुधाकर गुंड गुरूजी,बाबुराव पुजारी, अॅड.अजित गुंड, दत्ता सोनटक्के, महादेव सूर्यवंशी, अॅड. शरद गुंड, प्रशांत सोनटक्के, ज्योतीराम जाधव,पीरसाहब शेख, भरतदाजी गुंड, उद्योजक संजय पटवारी, अॅड. निवृत्ती कुदळे, सूर्यकांत गरड, रावसाहेब गुंड, कारभारी आदी मित्र परिवारांची उपस्थिती होती.  

 
Top