उस्मानाबाद : भोसगा ता. लोहारा येथील पोलीस पाटील ज्योती बसवंत हत्तरगे यांना श्री. जेजेटी युनिव्हर्सिटी राजस्थान कडुन  जीवशास्त्र द स्टडी ऑफ बायो दिव्हसिटी अचलेर  वॉटर टॅंक इन उस्मानाबाद महाराष्ट्र या विषयावर डॉक्टरेट ही पदवी बहाल झाली आहे. यामुळे ज्योती बसवंत हत्तरगे यांचा सर्वत्र कौतुक होत आहे. याबद्दल जवाहर महाविद्यालय अणदूर येथील प्राचार्य डॉ. चनशेट्टी सर, झुलॉजी डिपार्टमेंट तथा  गाईड डॉ. राठोड सर, बाड सर  तसेच कुमारस्वामी महाविद्यालया औसाचे प्राचार्य डॉ. एम एम बेटकर सर, नळदुर्ग महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बाहेर यांनी डॉ. ज्योती हत्तरगे  यांचा सत्कार केला. तसेच उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी उमरगा, मुरुम पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक माळी सर व सर्व पोलीस पाटील यांनीही अभिनंदन केले.  या यशामुळे डॉ. ज्योती बसवंत हत्तरगे  यांचा भोसगा व परिसरात कौतुक होत आहे.

 
Top